Thursday, 25 August 2011

अपेक्षा .


माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !

आनंद


हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?

Saturday, 20 August 2011

मैत्रिणीनो

मैत्रिणीनो आज जरा आपल्या विश्वा बद्दल बोलायला आले आहे ,मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आले आहे .आपण आयुष्यात अनेक नात्यांना किती सहजतेने सामोरे जातो ना ?प्रत्येक नात्यासोबत नवीन भूमिका, नवीन अनुभव ,नवीन आव्हान पेलत असतो आपण .आणि हे करताना सगळ्या कुटुंबाला पण धरून ठेवायचं असत .ही सगळी तारेवरची कसरत करताना आपल्याला किती अडचणींना सामोरे जाव लागत ,किती तरी प्रसंगी मनाची घुसमट होत असते .पण हे सागायचं कोणाला ?त्यासाठी विश्वास पात्र व्यक्ती तर हवी ना जवळ आपल्या .
पण आता तस नाही होणार आपण एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत .काय सांगाव तुमच्या काही प्रसंगातून कोणाला स्फूर्ती मिळेल ,किवा काही जणींना त्यांच्या समस्येचे उत्तर मिळेल .तसच आपण वयाच्या ४० शीत येतो तेव्हा परत वेगळ्या समस्या येतात ,शारीरक ,मानसिक जडणघडण बदलत असते .मूल मोठी झालेली असतात ,नवरा त्याचा कामात गुंतलेला असतो खूप एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मागे वळून बघितलं की जाणवत की अरे सगळ्यांच्या जवाबदारया पार पडताना आपण आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या विसरून गेलो आहोत .पण ठीक आहे अजूनही वेळ गेली नाहीये बरंच काही करता येण्यासारख आहे .
तुम्ही मला सांगू शकाल काय कराल ते ?तुमचे अनुभव शेअर कराल ?या तर मग एक नवीन विषयाला हात घालूया आणि बघुया काय निर्माण होत आहे ते .

Monday, 15 August 2011

स्नेहबंध--प्रेमाचे अतूट बंध

आपण आयुष्यात नात्यांच्या वेगवेगळ्या बंधनात अडकत असतो. वेळोवेळी वेगवेगळी बंधने निर्माण होत असतात. सुरवातीला हवीहवीशी वाटणारी बंधनं कालांतराने नकोशी वाटतात .आपण अडकलोय ,फसलो आहे हे भावना निर्माण करतात .
अस का होत याचा विचार केला तर अस जाणवत की याची सुरुवात मतभेदातून होताना दिसते .खरतर दोन किवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभेद असण खूप स्वाभाविक आहे .परंतु प्रत्येकाचा अट्टाहास असतो मतभेद मिटवण्याचा .माझच मत अधिक योग्य आहे हे पटवण्याचा .समोरच्या व्यक्ती पेक्षा माझ माझ्या विचारांवरील प्रेम जास्त महत्वाच ठरत.,आणि इथूनच नातेसंबधात दूरावा निर्माण होतो .
हेच मतभेद प्रेमाने समजून घेतले तर स्नेहबंध निर्माण होतात.जशी अनेक वाद्य मिळून एक सुरेल वाद्यसमूह तयार होतो तसेच आपण या सर्व नातेसंबंधातून एक अतूट स्नेहबंध  निर्माण करू शकतो.
खरंतर हे सर्व उमजत असत नातेसंबंधात निर्माण झालेला दुरावा, तणाव निर्माण करत असतो .आत मध्ये यातून बाहेर पडायची इच्छा असते .पण त्यासाठी समोरचाने एक पाउल पुढे टाकावे अशी अपेक्षा असते कारण आपला अहंकार आपल्याला तस करू देत नाही. आपापसातील दुरावा तसाच राहतो ,वाढत जातो .
पण जीवन खरोखर एवढं अवघड आहे का ?की आपण ते अवघड करत असतो ,हे जाणून घेण गरजेच आहे .त्यासाठी स्वताला जाणून घेणे अधिक महत्वाच आहे .

Loneliness

Loneliness-- it is man's worst punishment. It arises from divorce, death of spouse or out of  inability to find someone to share life. This loneliness creates big vacuum, mental stress, negativism, nothing to look forward to and the life seems worthless. People work hard to educate their children, give them best of everything that they themselves could not get. When children grow up and go abroad, it is fulfillment of big dream. However, the joy is only short lived because children do not look back since they are engrossed in their lives.Now comes the realization-how to cope up with loneliness... Does anybody has time for someone with such a predicament?

Life is much more than meeting daily needs. Life is beautiful.It needs to be enjoyed with near and dear ones.

Your comments are most welcome.