Monday, 15 August 2011

स्नेहबंध--प्रेमाचे अतूट बंध

आपण आयुष्यात नात्यांच्या वेगवेगळ्या बंधनात अडकत असतो. वेळोवेळी वेगवेगळी बंधने निर्माण होत असतात. सुरवातीला हवीहवीशी वाटणारी बंधनं कालांतराने नकोशी वाटतात .आपण अडकलोय ,फसलो आहे हे भावना निर्माण करतात .
अस का होत याचा विचार केला तर अस जाणवत की याची सुरुवात मतभेदातून होताना दिसते .खरतर दोन किवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभेद असण खूप स्वाभाविक आहे .परंतु प्रत्येकाचा अट्टाहास असतो मतभेद मिटवण्याचा .माझच मत अधिक योग्य आहे हे पटवण्याचा .समोरच्या व्यक्ती पेक्षा माझ माझ्या विचारांवरील प्रेम जास्त महत्वाच ठरत.,आणि इथूनच नातेसंबधात दूरावा निर्माण होतो .
हेच मतभेद प्रेमाने समजून घेतले तर स्नेहबंध निर्माण होतात.जशी अनेक वाद्य मिळून एक सुरेल वाद्यसमूह तयार होतो तसेच आपण या सर्व नातेसंबंधातून एक अतूट स्नेहबंध  निर्माण करू शकतो.
खरंतर हे सर्व उमजत असत नातेसंबंधात निर्माण झालेला दुरावा, तणाव निर्माण करत असतो .आत मध्ये यातून बाहेर पडायची इच्छा असते .पण त्यासाठी समोरचाने एक पाउल पुढे टाकावे अशी अपेक्षा असते कारण आपला अहंकार आपल्याला तस करू देत नाही. आपापसातील दुरावा तसाच राहतो ,वाढत जातो .
पण जीवन खरोखर एवढं अवघड आहे का ?की आपण ते अवघड करत असतो ,हे जाणून घेण गरजेच आहे .त्यासाठी स्वताला जाणून घेणे अधिक महत्वाच आहे .

No comments:

Post a Comment