बहुतेक जण आशावादी असतात; पण काहींना सतत निराशेने वेढलेले असते. मनानेच निर्माण केलेल्या आशा आणि निराशा या दोन अवस्थांकडे तटस्थपणे आणि पुरेशा समजूतदारपणे पाहायला शिकले पाहिजे. आशा मनाला उभारी देते; तर निराशा त्याला खोल गर्तेत लोटते. आशा कृतीला प्रवृत्त करते; तर निराशा निष्क्रिय बनवते. आशा म्हणजे उद्दिष्टाकडे केलेला सकारात्मक प्रवास आणि निराशा म्हणजे शून्यात घेतलेली उडी. आशा-निराशेचा खेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात सुरू असतो. आशेबरोबर ऊर्जा असते; म्हणूनच तिच्यात चैतन्य असते. निराशा म्हणजे ऊर्जाहीनता, आळस. तेथे तमाचे राज्य असते. अपेक्षित घडले नाही, की निराशा तिचे जाळे फेकते आणि आपण त्यात अडकतो. या "अनपेक्षिता'ची शक्याशक्यता, तारतम्य लक्षात घेणे, म्हणजेच निराशेपासून दूर राहणे.
- आशा जरूर हवी; कारण ती प्रगतीची वाट असते. एक महत्त्वाचे ः ती पोकळ असता कामा नये. पोकळ आशा छोट्या-छोट्या आंदोलनांनी वाऱ्यावर उडून जाते. आशा पक्की, समजुतीने निश्चित केलेली असेल, तर कोणत्याही बाह्य कारणांचा परिणाम तिच्यावर होत नाही.
- अंधार आणि निराशा यांचे नाते जवळचे आहे. निराशेने वेढलेली माणसे प्रकाश टाळतात, ती एकलकोंडी होतात, ती यामुळेच. निराश माणूस त्या निराशेलाच एवढा कवटाळून बसतो, त्याच विचारांत राहतो, की त्या गुंत्यातून सुटका करून घेणे त्याला जवळजवळ अशक्य वाटू लागते.
- प्रयत्नांचे सातत्य हा आशेकडे केलेला योग्य प्रवास असतो. प्रयत्नांशिवाय आशा पूर्ण होण्याचे स्वप्न म्हणजे हवेतील मनोरा. प्रयत्न, पुन्हा प्रयत्न, न थकता प्रयत्न ही आशेकडे जाण्याच्या प्रवासाची खरी किंमत असते. ती प्रत्येकाला चुकती करावीच लागते.
- आशा-निराशा या भावनांकडे अलिप्तपणे पाहता यायला हवे. ती आंदोलने येत-जात राहणारच. तुफान येईल, म्हणून बोटी-होड्या हाकारणे कुणा थांबवते थोडेच? त्यासाठी संयम आणि निकोप दृष्टिकोन हवा.
Counselor
Wednesday, 11 April 2012
आशा निराशा
Tuesday, 10 April 2012
स्वारगेट बस स्थानक- एक कटू अनुभव
मी पुण्याहून येत असताना स्वारगेटला गाडी सुटायला जरा वेळ होता म्हणून मी तिथल्या बाथरूम मध्ये गेले होते ,नेहेमी प्रमाणे अतिशय घाण होत म्हणून मी ते ना वापरताच निघाले तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं कि त्या बाथरूमच्या पडद्या च्या मागे २ ते ३ माणस उभी राहून आत बघत आहे माझ्या अंगावर एकदम काटाच आला ,किती भयानक आहे हे ,कधी कधी कॉलेजच्या मुली तिथे काही बदलायला येतात किवा इतरही बायका हे बाथरूम वापरत असणार मग समजा एखाद्याच्या मनात काही विकृत कल्पना येऊन त्याने त्यांचे फोटो काढले तर काय होणार ?मी हे तिथेल्या एका अधिकारी बाईला हे सांगितल तर ती म्हणाली कि तिकडे कशाला गेलात ,तिकडे आपण जाऊच नाही ,आम्ही पण खूप दा तक्रार करतो पण काही उपयोग नाही किती थंड पणे तिने उत्तर दिल बघा .
आपण काही करू शकतो या विषयात ?
आपण काही करू शकतो या विषयात ?
Thursday, 25 August 2011
अपेक्षा .
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी ‘कोणावर’ तरी, ‘कशावर’ तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
आनंद
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जsरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
‘माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद ‘लांबणीवर’ टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?
आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?
Saturday, 20 August 2011
मैत्रिणीनो
मैत्रिणीनो आज जरा आपल्या विश्वा बद्दल बोलायला आले आहे ,मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आले आहे .आपण आयुष्यात अनेक नात्यांना किती सहजतेने सामोरे जातो ना ?प्रत्येक नात्यासोबत नवीन भूमिका, नवीन अनुभव ,नवीन आव्हान पेलत असतो आपण .आणि हे करताना सगळ्या कुटुंबाला पण धरून ठेवायचं असत .ही सगळी तारेवरची कसरत करताना आपल्याला किती अडचणींना सामोरे जाव लागत ,किती तरी प्रसंगी मनाची घुसमट होत असते .पण हे सागायचं कोणाला ?त्यासाठी विश्वास पात्र व्यक्ती तर हवी ना जवळ आपल्या .
पण आता तस नाही होणार आपण एकमेकींशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत .काय सांगाव तुमच्या काही प्रसंगातून कोणाला स्फूर्ती मिळेल ,किवा काही जणींना त्यांच्या समस्येचे उत्तर मिळेल .तसच आपण वयाच्या ४० शीत येतो तेव्हा परत वेगळ्या समस्या येतात ,शारीरक ,मानसिक जडणघडण बदलत असते .मूल मोठी झालेली असतात ,नवरा त्याचा कामात गुंतलेला असतो खूप एकटेपणा जाणवतो ,तेव्हा मागे वळून बघितलं की जाणवत की अरे सगळ्यांच्या जवाबदारया पार पडताना आपण आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या विसरून गेलो आहोत .पण ठीक आहे अजूनही वेळ गेली नाहीये बरंच काही करता येण्यासारख आहे .
तुम्ही मला सांगू शकाल काय कराल ते ?तुमचे अनुभव शेअर कराल ?या तर मग एक नवीन विषयाला हात घालूया आणि बघुया काय निर्माण होत आहे ते .

Monday, 15 August 2011
स्नेहबंध--प्रेमाचे अतूट बंध
आपण आयुष्यात नात्यांच्या वेगवेगळ्या बंधनात अडकत असतो. वेळोवेळी वेगवेगळी बंधने निर्माण होत असतात. सुरवातीला हवीहवीशी वाटणारी बंधनं कालांतराने नकोशी वाटतात .आपण अडकलोय ,फसलो आहे हे भावना निर्माण करतात .
अस का होत याचा विचार केला तर अस जाणवत की याची सुरुवात मतभेदातून होताना दिसते .खरतर दोन किवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात मतभेद असण खूप स्वाभाविक आहे .परंतु प्रत्येकाचा अट्टाहास असतो मतभेद मिटवण्याचा .माझच मत अधिक योग्य आहे हे पटवण्याचा .समोरच्या व्यक्ती पेक्षा माझ माझ्या विचारांवरील प्रेम जास्त महत्वाच ठरत.,आणि इथूनच नातेसंबधात दूरावा निर्माण होतो .

हेच मतभेद प्रेमाने समजून घेतले तर स्नेहबंध निर्माण होतात.जशी अनेक वाद्य मिळून एक सुरेल वाद्यसमूह तयार होतो तसेच आपण या सर्व नातेसंबंधातून एक अतूट स्नेहबंध निर्माण करू शकतो.
खरंतर हे सर्व उमजत असत नातेसंबंधात निर्माण झालेला दुरावा, तणाव निर्माण करत असतो .आत मध्ये यातून बाहेर पडायची इच्छा असते .पण त्यासाठी समोरचाने एक पाउल पुढे टाकावे अशी अपेक्षा असते कारण आपला अहंकार आपल्याला तस करू देत नाही. आपापसातील दुरावा तसाच राहतो ,वाढत जातो .
पण जीवन खरोखर एवढं अवघड आहे का ?की आपण ते अवघड करत असतो ,हे जाणून घेण गरजेच आहे .त्यासाठी स्वताला जाणून घेणे अधिक महत्वाच आहे .

Loneliness
Loneliness-- it is man's worst punishment. It arises from divorce, death of spouse or out of inability to find someone to share life. This loneliness creates big vacuum, mental stress, negativism, nothing to look forward to and the life seems worthless. People work hard to educate their children, give them best of everything that they themselves could not get. When children grow up and go abroad, it is fulfillment of big dream. However, the joy is only short lived because children do not look back since they are engrossed in their lives.Now comes the realization-how to cope up with loneliness... Does anybody has time for someone with such a predicament?
Life is much more than meeting daily needs. Life is beautiful.It needs to be enjoyed with near and dear ones.
Your comments are most welcome.
Life is much more than meeting daily needs. Life is beautiful.It needs to be enjoyed with near and dear ones.
Your comments are most welcome.
Subscribe to:
Posts (Atom)