Tuesday, 10 April 2012

स्वारगेट बस स्थानक- एक कटू अनुभव

मी पुण्याहून येत असताना स्वारगेटला गाडी सुटायला जरा वेळ होता म्हणून मी तिथल्या बाथरूम मध्ये गेले होते ,नेहेमी प्रमाणे अतिशय घाण होत म्हणून मी ते ना वापरताच निघाले तेव्हा माझ्या अचानक लक्षात आलं कि त्या बाथरूमच्या पडद्या च्या मागे २ ते ३ माणस उभी राहून आत बघत आहे माझ्या अंगावर एकदम काटाच आला ,किती भयानक आहे हे ,कधी कधी कॉलेजच्या मुली तिथे काही बदलायला येतात  किवा इतरही बायका हे बाथरूम वापरत असणार मग समजा एखाद्याच्या मनात काही विकृत कल्पना येऊन त्याने त्यांचे फोटो काढले तर काय होणार ?मी हे तिथेल्या एका अधिकारी बाईला हे सांगितल तर ती म्हणाली कि तिकडे कशाला गेलात ,तिकडे आपण जाऊच नाही ,आम्ही पण खूप दा तक्रार करतो पण काही उपयोग नाही किती थंड पणे तिने उत्तर दिल बघा .
आपण काही करू शकतो या विषयात ?

7 comments:

  1. JYA BAI NI TULA AASA ANSWER DILA TICHA NAAV VICHARUN GHE MAG ME BAGHTO KAAY KARAYCHA TE

    ReplyDelete
  2. Horrible prakar aahe...takrar karayla havi

    ReplyDelete
  3. This is disgusting. Such matters need to be taken up with bus stand authority to put an end to the filth. It may not end with just a complaint. Much more....

    ReplyDelete
  4. बोईसरला दोन-तीन वेळा ग्रमपंचायतीत गेले होते, पावसाळा असल्याने आणि सकाळपासून घरून निघाल्याने तिथे बाथरूमला जाणे भागच होते, तिथे सरकारी कार्यालय असून आणि बर्‍याच महिला काम करत असून देखील एकूण आनंदच होता. स्वच्छता नव्हती, महिलांकरता म्हणून वेगळे बाथरूम नव्हते, पाणी नव्हते, ते बाथरून येण्याजाण्याच्या वाटेवरच होते आणि मुख्य म्हणजे त्याला कडी देखील नव्हती. तिथे रोज काम करणार्‍या महिलांची काय बिकट अवस्था होत असेल ?

    ReplyDelete
  5. मुळातच चुकी प्रशासनाचीच आहे...आधिच त्यांनी निट व्यवस्था केली असती तर हा प्रश्नच उदभवला नसता..तिथले जे कोणी अधिकारी आहेत,मुळात ती एक बाई असुन तिने असे उत्तर द्याव हेच मुळात पटत नाही...पण झाला तो प्रकार खरच वाईट होता...

    ReplyDelete
  6. या असल्या घाणेरड्या प्रकार बद्दल आपण पुणे पोलीस आयुक्त यांना लेखी स्वरुपात तक्रार द्या . त्या शिवाय असे प्रकार बंद होणार नाहीत. काही मदत हवी असल्यास मी करू शकतो.

    ReplyDelete
  7. KHARE tar sARVANI MILUN EK PATRA PATHAVUN BAGHAVE, PRASHASAN KAHI KARATE KA ?

    ReplyDelete